¡Sorpréndeme!

गुप्तचर यत्रणांनी धक्कादायक दिली माहिती पाहून व्हाल हैरान | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

देशातील जवळपास १०० तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्यावर दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तान, सीरिया आणि इराकला गेले आहेत. मात्र आयसिसमध्ये सामील झालेल्या तरुणांचा आकडा चिंतेचा विषय नसल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे. भारताची एकूण लोकसंख्या आणि त्यातील मुस्लिमांचे प्रमाण पाहता, हा आकडा चिंताजनक नसल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले.भारतातून ५० तरुण थेट आयसिसचे प्राबल्य असलेल्या देशांमध्ये गेले आहेत. तर इतर ५० तरुण आधी आयसिसचे वर्चस्व नसलेल्या भागांमध्ये गेले आणि तिथून ते आयसिसचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये पोहोचले, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली. यामधील बहुतांश तरुण सध्या आखाती देशांमध्ये आहेत. ‘भारत आणि पाश्चिमात्य देशांमधून आयसिसमध्ये दाखल झालेल्यांची संख्या अतिशय कमी आहे. यावरुन आयसिसची रणनिती अयशस्वी ठरत असल्याचे स्पष्ट होते. ग्लोबल जिहादसाठी तरुण त्यांच्या कुटुंबाला सोडून येण्यास तयार नाहीत, हेच यावरुन दिसते,’ अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने दिली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews